Tuesday, 12 September 2017

Completing Ten years

Completed 10 years at Cognizant. The journey has been amazing. Learnt a lot on professional front and progressed well.  Would love to sit with accounts one fine day to see what I learnt...what I un-learnt. So many people...processes..achievements ..learnings ..but all that was superseded with the token I received....the card and personally signed letter says it all...
Check it here....

Satyanarayan Prasanna

This year my daughter passed her 10th and I felt like it was completing one ( and a first major) milestone. I thought I should make it special.
I wanted Lil more than gifts or parties...that happens all around. I wanted some responsibility. ...some sense of achievement to me realised by her as well. Very casually I asked her if she would do the satyanarayan puja? She has seen me do the puja single handedly ( with complete authencity) for atleast 10 years now. I was expecting lukewarm response. And perhaps I may have to tell her my thoughts about doing this puja and stuff.
To my surprise...she instantly said YES! I was very happy that she imbibed what I thought was happening but was not sure of.
Promptly she got ready on time...with traditional wear ...without me having to tell her ☺
Here are the pics of that Puja...
May God bless her with the power to overpower nuances life may have to offer.

Monday, 11 September 2017

Two poems in a box..very interesting

मी राधा आहे
राधाच रहाणार
माझा पती हा माझाच आहे
....कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे.
आणि माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे......

मी सीता आहे
मी सीताच रहाणार
कितीही कठीण परिस्थितीत
तो माझ्या पाठीशी असतो
मी त्याच्या पाठीशी रहाणार
.......कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे
आणि माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे.....

मी मीरा आहे
मी मीराच राहणार
आमच्या दोघांच्या आनंदासाठी
संसाराच्या जबाबदारी बरोबरीने पेलणार.
कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे
आणि माझ्याप्रेमावर माझा विश्वास आहे......

मी यशोधरा आहे.
मी यशोधराच रहाणार
तो कर्तव्य सोडून जाणार नाही.
त्याच्या ज्ञानोपासनेत  आणि कर्तबगारीत
मी ही माझ्या कुवतीप्रमाणे
सहभागी होणार.
कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे
आणि माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे......

मी गांधारी नाही होणार
डोळे मिटून नाही रहाणार
त्याच्या सहवासाच्या स्वच्छ प्रकाशात
अर्थपूर्ण त्याग करणार
जसा त्यानंही केलाय
कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे
आणि माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे.......

मी त्याच्यासाठी जगेन
मी माझ्यासाठी जगेन
थोडंसं सहन करेन
तो ही करतोच की सहन.

अन्याय बलिदान ह्या वृत्ती
समाज आणि राष्ट्र पातळीवर
असू देत.

माझ्या त्याच्या संसाराच्या विश्वात
थोडीशी कुरबुर थोडासा अबोला
रागावणं तणतणणं चालेल मला

प्रेम व्यक्त करायला
I love you म्हटलंच पाहिजे असं नाही.
मुलांचा त्यानं घेतलेला पापा
माझे गाल लाल करतो 
हे त्यालाही माहीत आहे
कारण त्याच्यावर माझा विश्वास आहे
आणि माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे.......

Now read this version....

*आधुनिक स्त्री चे शपथपत्र*

मी 'मी'आहे... 'मी' च राहणार

मी *राधा* नाही होणार
माझ्या प्रेमकहाणीत
दुसऱ्या स्त्रीचा पती नसणार
रुक्मिणीच्या डोळ्यांत
काटा बनून मी नाही सलणार
मी राधा नाही होणार

मी *सीता* नाही होणार
माझ्या पावित्र्याचं
प्रमाणपत्र नाही देणार
अग्निपरीक्षा नाही देणार
तो काय मला त्यागणार
मीच त्याला सोडणार
मी सीता नाही होणार

मी *मीरा*ही नाही होणार
कुठल्याही मूर्तीच्या मोहाने
घर संसार नाही सोडणार
साधुंबरोबर नाही फिरणार
हातात एकतारी घेऊन
जबाबदाऱ्या नाही टाळणार
मी मीरा नाही होणार

मी *यशोधरा* नाही होणार
जो सोडून निघून गेला
सारी कर्तव्ये सोडून
स्वतः देव बनला
कितीही ज्ञान मिळवू दे
पण अशा पतीसाठी
मी पतिव्रता नाही होणार
मी यशोधरा नाही होणार

मी *उर्मिला*ही नाही होणार
पत्नीच्या सहवासाची
ज्याला कदर नाही
तिच्या त्रासाची ज्याला
जरासुद्धा जाणीव नाही
तिला एकाकी करून
जो भावासह राहणार
अशा पुरुषाला मी नाही वरणार
मी उर्मिला नाही होणार

मी *गांधारी* नाही होणार
आपले डोळे मिटून
अंधार स्वीकारून
अर्थहीन त्याग मी नाही करणार
अंध पतीचे डोळे होईन
माझ्या डोळ्यांनी तो बघेल
असे प्रयत्न करणार
मी गांधारी नाही होणार

मी त्याच्यासह जगेन,
ज्याला मनाने वरेन
पण म्हणून त्याचा अन्याय
मी नाही सहन करणार
कर्तव्याला नाही चुकणार
सारी निभावणार पण
बलिदानाच्या नावाखाली
यातना नाही सोसणार

*मी 'मी' आहे आणि 'मी'च राहणार*

Which one do you relate to?  A Lil bit of both??

Poetry box

*ओटा*

मला आवडतो
सगळे काही आवरून झाल्यानंतरचा
स्वच्छ पुसलेला ग्रानाईटचा
काळाकुळकुळीत ओटा
.
तो लख्ख चकाकत असतो , मग
मीही त्यात बघते स्वतःचे प्रतिबिंब
केस उसकटलेली , दमलेली मी
तरीही आनंदात न्हायलेली
मी प्रेमाने बनवलेले , वाढलेले जेवण जेवून
माझ्या माणसांचे झालेले तृप्त चेहरे बघून
समाधान पावलेली मी दिसते त्यात
.
सकाळचा प्रसन्न चेहऱ्याने
स्वागत करणारा ओटा
उत्सुक असतो माझ्या विविध पाककला
अंगावर मिरवून घ्यायला ...
तो रोज होत जातो अनुभवी , प्रगल्भ
माझ्यातील स्त्रीला , जाणून घेऊन
.
सांडलेले पीठ , उडालेली फोडणी
चुकलेले अंदाज , फसलेली पाकक्रिया
कधीतरी सुट्टी , कधीतरी जास्त काम
सगळे अनुभव गाठीशी असतात त्याच्या
.
कधीतरी चार पाच दिवसासाठी बाहेर गेल्यावर
ओकाबोका , उदास , माझी आठवण काढणारा ओटा
मी परतून आले कि अगदी आतुर असतो मला भेटायला
मी हि त्याला न्हाऊ घालते , स्वच्छ करते
तो परत लागतो चकाकू
.
मला तोच शिकवण देतो
कितीही सांडलं, लवंडलं
तरीही एक हात फिरवून स्वच्छ व्हायचं
आणि पुन्हा लाकाकायचं असत
आपलं देखणं प्रतिबिंब बघायला ....

Monday, 19 June 2017

20 verses

*अतिशय सुंदर रचना आहे. पूर्ण वाचून  घ्या. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*

अतीकोपता कार्य जाते  लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

*शांतपणे वाचा आणि प्रत्येक श्लोक जगा !!!*

Saturday, 17 June 2017

Pleasure of passing on. ..

My mother taught me to knit as part of my school craft subject. After many years I am passing it on to my daughter. Not as part of subject but because I thought she should know and she felt the same....so today we sat and did this as a new begining 😍

Many more of needle work and gappa to follow ....

Mango cheese cake..Anniversary special